..आणि मुख्याधिकाऱ्यांनचा पाठलाग ठरला व्यर्थ ..!

 

पारोळा, प्रतिनिधी । शहरात सध्या प्लास्टिक कॅरीबॅग पिशव्यांवर बंदी आहे. या पिशव्या ठेवणारे व हाताळणारे यांच्यावर पालिकेने दंडात्मक कारवाईची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आज सायंकाळी एक तरुणाच्या हातात अशीच कॅरीबॅग असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला पकडण्यासाठी सायकलवरून पाठलाग केला. परंतु, तरुणाने पुढे जाऊन हातचलाखीने ती कॅरीबॅग रस्त्यावर बसलेल्या मित्रांकडे सोडून देत मुख्याधिकारीचा पाठलाग व्यर्थ ठरविलाचा रंजक किस्सा घडला आहे. याची एकाच हास्यास्पद चर्चां बाजारपेठत ऐकण्यास मिळाली.

कॅरीबॅग बंदीच्या नियमांचे पारोळा पालिकेकडून अंमलबजावणी मोहीमही राबवली जात आहे. त्यासाठी नगरपालिकेने व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांना यासंदर्भात सूचना देऊन प्लास्टिक बंदी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, असे असताना देखील शहरात प्लास्टिक कॅरीबॅग मध्ये वस्तू विकणे हे सुरुच आहे. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नगरपालिके समोरील बाजारपेठेत एक तरुण हा लसूण कॅरीबॅगमध्ये घेऊन आपल्या घरी जात असताना मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या लक्षात आले. मुख्याधिकारी मुंडे हे सध्या पालिकेत सायकल वरून ये-जा करीत आहेत. ते देखील सायकलवरून घरी जात असतांनाच हा तरुण निदर्शनास आल्याने त्यांनी त्या तरुणला सायकली वरच जाऊन पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. तरुणाला याची जाणीव होताच तो तरुण बाजारपेठेतून घराकडे पळत सुटला. मुंडेंनी त्याच्या मागे सायकलीवर पाठलाग सुरू ठेवला. तो तरुण गल्ली बोळातून पुढे जात असताना त्याने हातचलाखीने रस्त्यावर बसलेले काही मित्रांकडे ती कॅरीबॅग फेकून दिली. काही अंतराने पुढे जाऊन उभा राहिला. मुख्याधिकारी यांनी त्याची चौकशी करत कॅरीबॅग कुठे आहे. असा प्रश्न विचारला. त्याने माझ्याजवळ कॅरीबॅग कुठे आहे. आसा प्रतिप्रश्न मुख्याधिकाऱ्यांना विचारून बुचकाळात टाकले. दरम्यान मुख्याधिकारी मुंडे यांनी तो का पळत होता. असा प्रश्न केला असता तुम्ही माझा पाठलाग करीत होते. म्हणून मी भितीपोटी पळत होतो असा प्रतिप्रश्न करून मुंडे यांना पून्हा बुचकळ्यात टाकले. शेवटी काही मिळून न आल्याने मुख्याधिकारी यांचा हा पाठलाग व्यर्थ ठरला. दोन दिवसांपूर्वी देखील एका विक्रेताकड़े मुख्याधिकारी यांनी रात्री आठच्या सुमारास अशीच कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या ठिकाणी देखील संबंधिताने हातचलाखी करून मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईपासून स्वतःला वाचून घेतल्याचा प्रकार झाला होता. शहरात सध्या मुख्याधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईचे कौतुक होत असून त्यांच्या या भीतीपोटी वेगवेगळे रंजक किस्से हे बाजारपेठेत पाहण्यात व ऐकण्यास मिळत आहेत.

Protected Content