रावेर शौचालय घोटाळा : आरोपींनी जमा केली १० लाख रुपये

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीचा बहुचर्चीत वयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात अटकेतील २२ पैकी ८ आरोपंीनी त्यांच्या खात्यावर आलेली सुमारे १० लाख रुपये तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांच्याकडे जमा केले आहे.

राज्यभर गाजलेला रावेर पंचायत समिती येथील वयक्तीक शौचालय योजनेत सुमारे दीड कोटीच्या वर भ्रष्ट्राचार झाला होता.या प्रकरणी पंचायत समितीचे लेखाधिकारीसह एकूण २४ आरोपी अटक करण्यात आली होती.त्यापैकी २ आरोपींना न्यायालया कडून जामीन मिळाला असून.आता तुरुंगात असलेल्या पैकी आठ जणांनी सुमारे दहा लाख रुपये माझ्या कडे जमा करण्यात आल्याचे तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांनी सांगितले.

Protected Content