जळगावात प्लास्टिक कंपनीला आग; लाखोंचे नुकसान (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील एका प्लास्टिक कंपनीला आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग ४  अग्निशमन बंबाच्या मदतीने विझविन्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआईडीसीतील ई सेक्टर मधील आशीर्वाद प्लास्टिक कंपनीला आज सकाळी ८  वाजता शार्टसर्किटमुळे आग लागली. या अगिमुळे कंपनीतिल प्लास्टिक समान जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिका आणि जैन यांचे ४ अग्निशमन बंब मागवण्यात आले. तर एमआयडीसी पोलिसातील कर्मचारी व बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली.

Protected Content