जळगावात आयशरमधून २६ प्रवाशांची वाहतूक; चालकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यात विनापरवानगी प्रवास करण्यास मनाईचे आदेशत असतांना बेकायदेशीर आयशर ट्रकमधून २६ प्रवाश्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील मुकटी येथून आयशर ट्रकचालक याकुब गयासुद्दीन पटेल (वय-34) रा. वाघोदा खुर्द सावदा ता. रावेर त्याच्या ताब्यातील ट्रक क्र. (एमएच ०४ इवाय ५६१५) मध्ये विनापरवाना २६ प्रवाश्यांची वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदीप वाठोरे, सफौ रामकृष्ण पाटील, पो.कॉ. मुदस्सर काझी, पोका सचीन पाटील, पो.कॉ. अशोक सनगत, पोकॉ गोविंदा पाटील यांनी अजिंठा चौफुलीवर कारवाई करत ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले.

या प्रवाश्यांना घेतले ताब्यात
धुळे जिल्ह्यातील मुकटी येथून पुढे मध्यप्रदेशाकडे जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. नंदकिशोर श्रीधरप्रसाद कोल, छोट् श्रीमलाई कुमार काल, लवकुश लुभाना बनसाल, हरीक्षोम भुपंत मिसाद, रामकेसरचाल वनशु अहीरवाल, मोहम्मद अवास मोहम्मद समार, कृष्णाकांत अरविंद अहीरवाल, सुरेशासिंग श्रीप्रसादसिंग, लखन रामनरेश बद्री यादव, बद्रीनाथ तुदुली यादव, रामचंद्र मश्री प्रसाद नित्याल, पपु मिसाद रामराज मिसाद, गोपाल छोटेलाल कुवत, सजाक मोहम्मद सलार मोहम्मद, विजय नामला कौल, लौकनाश बध्दकोन कौल, रमेश भालु यादव, दिसाना रामगड काल, पाशी खेला कौल, कमलेश छल्लु कौल, वकील खैला कोल, मोहम्मद सुब्रानी जुअत, मोहम्मद जलील मोहम्मद अन्वर, रामराज निसाद, जगदीश पार बच्चु प्रसाद, गोला केशव सर्व रा.मध्यप्रदेश अशी प्रवाश्यांची नावे असून सर्वांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेवून जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर राधाकृष्ण मंगलकार्यालयात सर्वाना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव कमी व्हावा यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. यात जिल्ह्याच्या सिमा सिल करण्यात आले असतांना आयशर ट्रकचालकाने बेकायदेशीर २६ प्रवाश्यांना ट्रक मधून मध्यप्रदेशाकडे घेवून जात होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोकॉ गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात आयशर ट्रकचालक याकुब पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content