मुक्त विद्यापिठाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून यात विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमुळे परिक्षांचे निकाल लांबणीवर पडले आहेत. तथापि, निकालाची वाट न पाहता, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शहरातील एम.जे. कॉलेजमध्ये याचे केंद्र आहे.

या अनुषंगाने कॉलेजतर्फे देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बीए / बी.कॉम व एमबीए प्रवेश ऑनलाइन पद्धतीने १० ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी निकालाचीची वाट न पाहता द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाला विद्यापीठाच्या http://ycmouoa.digitaluniversity.ac/Login या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अभ्यासकेंद्र शुल्क गुगल पे अथवा “फोन पे’ने ऑनलाइन पद्धतीने अभ्यास केंद्राच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यात जमा करावे व त्याचा स्क्रीन शॉट घ्यावा आणि सोबत पीडीएफ प्रवेश अर्ज ही दोन्ही कागदपत्रे महाविद्यालयाच्या ycmoumj.cadmission5303a @gmail.com या ई-मेलवर पाठवावे.

अधिक माहितीसाठी मू.जे.महाविद्यालय अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा, असे प्राचार्य व केंद्रप्रमुख प्रा संजय ना. भारंबे यांनी केले आहे.

Protected Content