घरा समोरून एकाची दुचाकी लांबविली

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गजानन महाराज नगरातील एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धनसिंग वामनसिंग पाटील (वय-४०) रा. गजानन महाराज नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कामावर जाण्यासाठी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीजी ८६७६) चा वापर करतात. शनिवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या समोर पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर रविवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भुसावळ शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश निकम करीत आहे.

Protected Content