गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फ्रेशर पार्टी उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात प्रथम वर्ष बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांची freshers party उत्साहात पार पडली.

 

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीस सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांना संबोधताना ते म्हणाले की पदवीचे शिक्षण घेताना स्टेज डेअरिंग, कौशल्य विकास इत्यादींवर भर देणे आवश्यक आहे. नवनवीन ज्ञान आत्मसात करा, वाचन करा ज्याचा तुम्हाला करिअर मध्ये फायदा होईल. संभाषण कौशल्य वाढवा. लायब्ररीचा पुरेपुर उपयोग करा. महाविद्यालयामध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमा मध्ये सहभाग घ्या.

 

सदर कार्यक्रमात मिठाई व पुष्प देऊन प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, ड्रामा, एक मिनिट गेम,  बलून गेम इत्यादीचा समावेश होता. मिस्टर फ्रेशर व मिस फ्रेशर हि स्पर्धा घेतली गेली.

 

या स्पर्धेमध्ये मिस्टर फ्रेशर कृष्णा भामरे व मिस फ्रेशर मनस्वी परदेशी यांची निवड झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारस सपकाळे, भूपेश लुंड, भूमिका नाले, कोमल साईंकार यांनी केले.   कार्यक्रमाचे कामकाज प्रा.चारुशीला चौधरी यांनी पाहिले. सदर कार्यक्रमास डॉ. नीलिमा  वारके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content