घरासमोरून एकाची दुचाकी लांबविली; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील योगेश्वर नगरातील तळेले कॉलनीतून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवार ९ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवार १० मे रोजी रात्री १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात दत्तात्रेय घनश्याम जोशी हे सद्या शहरातील योगेश्वर नगरातील तळेले कॉलनी येथे वास्तव्यास आहे. बुधवार ८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास जोशी यांनी त्यांची (एमएच १९, सीडी, ५०३२) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावलेली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जोशी यांची दुचाकी चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी गुरूवार ९ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीला आली. सुमारास दत्तात्रेय जोशी यांना दुचाकी लावलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून न आल्याने त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील मिळून न आल्याने अखेर त्यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवार १० मे रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहे.

Protected Content