Home Cities जळगाव मोठी बातमी : शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी !

मोठी बातमी : शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी !

0
47


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना महाप्रबोधन यात्रेत भाषण करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. परवा धरणगाव, काल पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. दरम्यान, आजच त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी गुजर समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. यामुळे आज चोपडा तर उद्या मुक्ताईनगरातील शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ते भाषण करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पोलीस प्रशासनाने याबाबतची नोटीस आज कोळी यांना जारी केली. जळगावात ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस दाखल झाले असता शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.


Protected Content

Play sound