जळगावात रविवारी रंगणार भव्य कुस्ती दंगल !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात श्रीराम रथोत्सवानिमित्त शहरातील जी.एस. मैदानात रविवारी ६ नोव्हेंबर रोजी कुस्त्यांची भव्य दंगल होणार असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील यांनी गुरूवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

श्रीराम रथोत्सवात निमित्ताने कुस्त्यांची भव्य दंगल येत्या रविवारी ६ नोव्हेंबर रोजी होणार असून यावर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती लक्षवेधी ठरणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. या कुस्तीचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, उद्योजक श्रीराम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिराच्या रथोत्सवानिमित्त गेल्या ७ वर्षांपासून केशवस्मृतीच्या वतीने दरवर्षी कुस्तीचे दंगल आयोजित केले जाते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कुस्त्यांची दंगल आयोजित करता आले नाही. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील विविध भागातून मल्ल यात सहभागी होत असतात. शुक्रवारी ४ नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील श्रीराम मंदिर संस्थांचा रथोत्सव आहे. यानंतर रविवार ६ नंबर नोव्हेंबर रोजी कुस्त्यांची दंगल शहरातील शिवतीर्थ मैदानावर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेच्या वेळेत होणार आहे. भारत विरुद्ध जॉर्जिया अशी ही कुस्ती असेल. पुणे येथील पैलवान भारत मदाने व जॉर्जिया देशातील पैलवान टॅडो जार्जिया यांच्यातील ही कुस्ती लक्षवेधी ठरणार आहे. या कुस्ती महोत्सवात राज्यासह इतर राज्यातील खेळाडू सहभाग नोंदविणार आहे. विशेष म्हणजे मुलींची कुस्ती देखील लक्षवेधी ठरणार असल्याची माहिती केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील यांनी दिली. याप्रसंगी दीपक जोशी, बापूसाहेब पाटील, सुनील शिंदे, दीपक जोवी, राहुल वाघ, प्रशांत जगताप, अनिल मानके यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content