न्यायालयाच्या गेट समोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर २ जवळ पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवार ३ मे रोजी दुपारी ४.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विश्वासराव धर्मराज पाटील वय-४०, रा. श्रीधर नगर जळगाव हे तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून जिल्हा परिषदेत ते नोकरीला आहे. दरम्यान शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएल ५३११) ने जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर -२ जवळ आलेले होते. त्याठिकाणी त्यांनी दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेले. पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही बाब विश्वासराव पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर निकुंभ हे करीत आहे.

Protected Content