Home क्राईम बसस्थानकासमोरून एकाची दुचाकी लांबविली

बसस्थानकासमोरून एकाची दुचाकी लांबविली

0
40


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील नवीन बस स्थानकासमोरील समोरून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २० जानेवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, हितेश ओम प्रकाश घेई (वय-३४) रा. हटकर समाज हॉल, मोहाडी रोड जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने वीस जानेवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ बीएस २८०४) ही जळगाव शहरातील नवीन बस स्थानकासमोरील पाणपोईजवळ पार्किंगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आली नाही. अखेर रविवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गुलाबराव सैंदाणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound