गोमांस बाळगणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील इंदिरानगर बेकायदेशीर रित्या गोमांस घरात आढळून आल्याचा प्रकार रविवार २१ जानेवारी रोजी रात्री १ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता एका तरुणा विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील इंदिरानगर शाहरुख मेहबूब कुरेशी (वय-२५) हा तरुण घरात गोमांस व आतडे बेकायदेशीर रित्या घरात ठेवल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी २१ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी कारवाई करत १४० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकारणी दीपक अरुण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख मेहबूब कुरेशी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे हे करीत आहे.

Protected Content