अज्ञात दुचाकीच्या धडकेत जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रोडवर अज्ञात भरधाव दुचाकीने ६० वर्षीय वृध्दाला जोरदार धडक दिल्याची घटन १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. अखेर ८ दिवसांनी मृत्यूशी झुंज देताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. भावलाल गुलाब चव्हाण (वय ६०, रा. रामदेववाडी ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे.

भावलाल चव्हाण हे जळके ते वावडदा रस्त्यामध्ये असलेल्या एका रिसॉर्टवर वॉचमन म्हणून काम करीत होते. मंगळवारी १९ मार्च रोजी ते ड्युटीवर होते. जळके ते वावडदा रस्त्यावर संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पायी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने भावलाल चव्हाण यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर ८ दिवसांनी मंगळवारी २६ मार्च रोजी त्यांची उपचारादरम्यान सकाळी ७ वाजता प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, २ विवाहित मुली असा परिवार आहे. याबाबत पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content