नाशिकमधून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर; मात्र महायुतीच्या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरूच

नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीसाठी २७ मार्च रोजी आज शिवसेना उबाठा गटाची १७ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी महत्वाचा मतदारसंघ आहे. येथे सध्या खासदार शिवसेनेचे हेमंत गोडसे हे आहे. पण ते शिंदे गटात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये प्रबळ उमेदवाराची गरज होती. अशातच ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

राजाभाऊ वाजे हे राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे आजोबा शंकर बाळाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते. त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी २००९ साली विधानसभेची निवडणूक सिन्नरमधूनच लढवली होती. राजाभाऊ वाजे यांचा सामना महायुतीच्या कोणत्या उमेदवारीशी होणार हे निश्चित झालेले नाही आहे.

महायुतीत या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंद गटातून रस्सीखेच सुरू आहे. या जागेसाठी भाजपचे कार्यकर्ते दिनकर पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे, कारण नाशिकमध्ये या भाजपचे तीन आमदार सध्या सत्तेत आहे. शिवसेना शिंदे गट सध्या खासदार असलेले हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवण्यासाठी आपल्या भूमिकेवर ठाम उभा आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने अलीकडे येवलाचे आमदार छगन भुजबळ यांचे नाव पुढे केले.

Protected Content