नागरिकत्व कायद्यात बदल होण्याची शक्यता; अमित शहांनी दिले संकेत

amit shaha 1

झारखंड वृत्तसंस्था । नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याचे संकेत झारखंडमधील गिरिडीह येथे एका निवडणूक सभेत दिले आहेत. त्याचबरोबर ख्रिसमसनंतर या मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो, असेही संकेत त्यांनी आपल्या प्रचारसभेत दिले. दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील अनेक भागांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्यात वातावरण तणावाचे आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या कायद्यात बदल करावेत असे आपल्याला सांगितल्याचे अमित शहा यांनी सभेत बोलताना सांगितले. संगमा यांना ख्रिसमसनंतर आपली भेट घ्यावी असेही सांगितल्याचे शहा म्हणाले. मेघालयसाठी सर्जनशील पद्धतीने काही उपाय करू शकतो का याचा विचार केला जाऊ शकतो असे शहा म्हणाले. कुणालाही या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचेही शहा म्हणाले. या पूर्वी लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे वक्तल्य मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. शाह यांचे नागरिकत्व कायद्यावरील हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नागरिकत्व कायद्याची आमच्या राज्यात अंमलबजावणी करणार नाही, असे पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Protected Content