मेहरगांवातील बौध्दांवर सामुहिक अन्याय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धुळे येथील मेहेरगावमध्ये पोळाच्या दिवशी गावातील बौद्धांवर झालेल्या हल्यातील आरोपींना कडक शासन करण्याबाबतचे निवेदन प्रातधिकारी यांना देण्यात आले.

यात “मेहरगांवातील बौध्दांवर झालेल्या सामुहिक अन्याय पोळाच्या दिवशी झालेल्या वादाला वेगळे वळण देवून बौद्ध समाजाला मेहरगांव येथील काही समाजकंटकांनी सामूहिक बहिष्कार टाकला होता. तसेच काही बौद्ध तरुणांना तसेच महिलांना मारहाण करण्यात आली. त्या संदर्भी संबंधितांबर सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रासिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे. असे असतांना देखील सदर गुन्हयातील आरोपितांवर योग्य ती तात्काळ कार्यवाही करण्यात आली नाही. तरी चौकशी होवून त्यांच्यावर होईल ते कडक शासन करून त्यांच्यावरती फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी. जेणेकरून लोकशाहीला काळीमा फासण्याची कोणी हिम्मत करणार नाही.” अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी (आंबेडकर गट) यांच्या वतीने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना देण्यात आले.

याप्रसंगी पितांबर वाघ, अॅड. अभिजीत बिऱ्हाडे, समाज भूषण यशवंत बैसाणे, पंकज सोनवणे, अजय मोरे, छन्नू मोरे, भैय्या शिरसाट, संदीप नगराळे, गोपाल पवार, राहुल वाडेकर, विनोद बिऱ्हाडे, पप्पू केदार, उत्तम नगराळे, किरण बच्छाव, प्रदीप मैलागिर, अजय गव्हाणे, मुन्ना सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content