Home आरोग्य महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढणार?

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढणार?


 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  उद्या  मंत्रिमंडळ बैठकीची  संभावना आहे. अद्याप सूचना आलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कॅबिनेट सदस्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत जे निर्बंध आहेत ते वाढवायचे की कमी करायचे यासंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात,” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

 

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठू लागल्याने राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला  परिस्थिती नियंत्रणात न आल्याने लॉकडाउन नंतर १५ एप्रिलपर्यंत वाढवला होता. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसंच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

यावेळी त्यांनी लगेच पूर्ण लॉकडाउन हटवला जाईल अशी अपेक्षा करु नका म्हटलं आहे. “सगळं लगेच १०० टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असे माझा अंदाज आहे. . पण पूर्ण लॉकडाउन काढून १०० टक्के मोकळीक होईल असं होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असं त्यांनी सांगितलं आहे.

 

राज्यात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाउनची तयारी करत आहे.

 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी  “आत्ताची जशी स्थिती आहे तसंच आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी विचार करण्यात येईल. लॉकडाउन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो, कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो, कोणते निर्बंध कडक करायचे याचा विचार करावा लागेल. आपण अभ्यास करत असून सर्वांची मतं घेत आहोत, त्यामुळेच यश मिळत आहे. टास्क फोर्स काय शिफारस करतं यासंबंधी कॅबिनेटमध्ये चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती दिली

 

दरम्यान यावेळी त्यांनी लॉकडाउनचा फायदा झाल्याची माहिती दिली आहे. “लॉकडाउनमुळे मुंबई आणि महाराष्ट्राचा फायदा झाला आहे. लॉकडाउनआधी मुंबईची परिस्थिती, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दुसरा लॉकडाउन करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपली तयारी सुरु होती. जम्बो सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे, कामं सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात आता रेमडसेविरसाठी पहिल्यासारखी मारामारी नाही,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound