सुभाष गॅरेजसमोर अपघातात कारचालकाचा मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील रेल्वे उड्डाणपूला जवळील सुभाष गॅरेज जवळ झालेल्या अपघातात ४२ वर्षीय व्यक्ती मृत्यू झाल्याची घटना रविवारी २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजेश सुरेश भंगाडे वय-४२, रा. महेश नगर भुसावळ असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजेश भंगाळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. रविवार २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता ते त्यांची कार क्रमांक (एमएच ०५ सीव्ही ९८५२) ने घरी जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर सुभाष गॅरेजजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने नजीकच्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. दरम्यान या घटनेबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे हे करीत आहे.

Protected Content