गोदावरी पुलावरून कार कोसळल्याने एक जण ठार, दोन जखमी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकमधील गोदावरी नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. हॉटेल गंमत जंमत परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात कार थेट गोदावरी नदीत कोसळली आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चकनाचुर झाला आहे.

कारच्या काचादेखील फुटल्या आहेत. अपघातात नितीन कापडणीस या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर तर अपघातात किरण कदम, योगेश पानसरे हे तरुण गंभीर जखमी झाले आहे. कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली आहे. रात्रीवेळीस ही घटना घडली आहे. अपघातात जखमी तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Protected Content