मॉ साहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा नगरीत जल्लोष !

सिंदखेड राजा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मॉ साहेब जिजाऊ यांच्या ४२५ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सिंदखेड राजा नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यभरातील जिजाऊ भक्तांसाठी मांदियाळी बुधवारी संध्याकाळपासूनच सिनखेडराजा एकच गर्दी जमली आहे.

राजवाड्यासह जिजाऊ सृष्टी रोशनी उजळून निघाली आहे. त्याकरता बुलढाणा जिल्ह्यात सार्वत्रिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. गुरुवार १२ जानेवारी सकाळी सूर्योदयावी राजवाड्यावर महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालखीसह वारकरी दिंडी ही राजवाड्यावरून जिजाऊ दुसरीकडे प्रस्थान केली. सकाळी ९ वाजता शिवधर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत जिजाऊ सृष्टीवर शाहिरांचे पोवाडे सांस्कृतिक कार्यक्रम विशेष सत्कार सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते मॉ साहेब जिजाऊ यांच्या ४२५व्या जन्मोत्सवानिमित्त सिनखेडराजातील राजवाडावर आकर्षण करण्यात आली आहे. सोबतच ११ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील महिलांनी राजवाडा परिसरात दीप लावून दीपोत्सव साजरा केला. ४२५ मशाली घेऊन शहरातून मशाल यात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमास सिनखेडराजा नगरीतील नागरिकांचे बाहेरून जिल्ह्यातील आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर एकंदरीत आज मासाहेब जिजाऊ यांच्या 425 व्या जन्मोत्सवासाठी संपूर्ण मातृ नगरी दणाणून गेली आहे.

Protected Content