Home क्राईम धक्कादायक : गाणी वाजवण्यास नकार दिला म्हणून डिजेवाल्यांच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके

धक्कादायक : गाणी वाजवण्यास नकार दिला म्हणून डिजेवाल्यांच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके

0
113


crime 2

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक शहरातील डिजेवाल्याने रात्री दहा वाजेनंतर गाणी वाजविण्यास नकार दिल्यामुळे काही नराधमांनी डीजेवाल्यांना अमानुष मारहाण करत त्यांच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोघेही पीडित तरुण गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, संदेश काजळे या तरुणाचा 9 जानेवारी रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्ताने नाशिकच्या दरीमातोरी गावातील एका फार्महाऊसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टी रात्री साडे दहानंतरही सुरुच होती. कायद्यानुसार रात्री दहा वाजेनंतर डिजे वाजवता येत नाही, असे कारण सांगत डिजेवाल्याने रात्री दहा वाजेनंतर डिजे वाजवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पार्टीतील दहा ते बारा जणांनी डिजे बंद केला म्हणून त्यांना मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपींनी पीडितांचे कपडे काढून त्यांच्या गुप्त अंगांवर सिगारेटचे चटके दिले. नराधमांनी पीडितांना बेल्ट आणि बांबुने मारहाण केली. पीडितांच्या अंगावर थंड पाणी टाकत ठिकठिकाणी विजेचा शॉकही दिला. यासोबतच दारुच्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्यांनी मारहाण करत रात्रभर अत्याचार केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत पीडितांच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.


Protected Content

Play sound