आम्हाला शहरी नक्षलवादी ठरवणारे सत्ताधारी कोण? : अरुणा रॉय

aruna roy

 

पुणे (वृत्तसंस्था) ‘देशातील सद्यस्थितीबाबत उघड बोलता येत नाही. अनेक ठिकाणी जमावबंदी लागू केली जाते. त्यामुळे धरणे आंदोलनही करता येत नाही. काही बोलले तर देशद्रोही ठरवले जाते. अशावेळी पूर्ण ताकदीने प्रश्न विचारणे हे बुद्धिजीवींचे कामच आहे, असे सांगत आम्ही कोण आहोत, ते आम्ही ठरवू. आमची ओळख ठरवणारे आम्हाला शहरी नक्षलवादी ठरवणारे सत्ताधारी कोण,’ असा परखड सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी विचारला आहे.

 

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे साहित्य व समाजकार्य पुरस्कारांचे वितरण रविवारी रॉय यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. रॉय पुढे म्हणाल्या की, देशातील अन्याय, दडपशाही, लोकशाहीची गळचेपी रोखण्यासाठी देशातील युवाशक्ती निडरपणे पुढे येत आहे. आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे. एनआरसी, सीएए आणि एनपीआर हे तिन्ही कायदे फक्त मुस्लिमांच्याच विरोधात नाहीत. तर कुठलीही कागदपत्रे नसलेल्यांच्याही विरोधात आहेत. त्याबद्दल नागरिकांचे प्रबोधन गरजेचे आहे. देशाची परिस्थिती सध्या नाजूक आहे. त्यामुळे देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकजूट होऊन आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे. तर कोरेगाव भीमा प्रकरणाविरोधात जे बोलले त्यांनाच अटक केली गेली. या बाबतीत जे काही घडले ते कल्पनेपलीकडचे आहे, असेही रॉय म्हणाल्या.

Protected Content