भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|तालुक्यातील पाळधी गावाजवळील महामार्गाजवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. जखमी दुचाकी स्वराला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत धरणगाव पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यातील फुलपाट येथील दत्तू प्रकाश पाटील (वय ३५) हे आपली दुचाकी (एमएच – १९, बीटी – १०१५) ने शुक्रवारी ५ जुलै रोजी दुपारी ५ वाजेचा सुमारास काम आटोपून घरी चालले होते. याच वेळी धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील महामार्गावरून भरधाव वेगाने डंपर (एमएच १९, झेड-३७५१) हा जळगावकडे जात असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण दत्तू पाटील हे फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून डोक्याला गंभीर इजा व मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दत्तू पाटील यांच्या पत्नी मंगलबाई पाटील या फुलपाटच्या सरपंच आहेत. अपघातातील डंपर हे पोलिसात जप्त करण्यात आले आहे. याबाबत धरणगाव पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

Protected Content