ड्रग्ज प्रकरणात शाहरूखकडे २५ कोटींची मागणी : पंचाचा दावा

मुंबई प्रतिनिधी | सर्वत्र गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने किरण गोसावीने शाहरूखकडे २५ कोटी रूपयांची मागणी केली असता १८ कोटींची डील झाल्याचा धक्कादायक आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यातील आठ कोटी समीर वानखेडेंना देण्यात आल्याचेही त्याने सांगितले आहे.

 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी या प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने या कथित व्हिडीओत केलाय. प्रभाकर साईलने तो के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक असल्याचे सांगत आहे.

या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणत आहे, आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथं ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठिमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितलं तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर के. पी. गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत त्यावेळी काय झालं हे मला समजलं नाही. गाडीमधून पुन्हा त्यांनी फोन केला की २५ सांग, शेवटी १८ फायनल कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. तसेच १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मी एवढं त्यांचं फोनवरचं संभाषण ऐकलं, अशी माहिती प्रभाकर साईलने दिलीय.

Protected Content