Home Cities एरंडोल चेन स्नॅचिंग करणारे दोघे पोलीसांच्या जाळ्यात

चेन स्नॅचिंग करणारे दोघे पोलीसांच्या जाळ्यात


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील एका महिला पहाटे मॉर्निंग वॉकला जात असतांना चोरट्यांनी गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धी पोत लांबविणाऱ्या तिघांपैकी दोन संशयितांना पकडण्यात एरंडोल पोलीसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल येथे विमलबाई चौधरी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी चोरटे हे हे चाळीसगाव येथील मुसा कादरी बाबा दर्गा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश अहिरे, पोउनि शरद बागल, पोकॉ अनिल पाटील, पोना मिलिंद कुमावत, अकिल मुजावर आदींनी चाळीसगाव येथे जाऊन सापळा रचला. आरोपींना पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यात सय्यद तोशिब तय्यब अली (वय-२४ ) रा. पिंप्राळा हुडको जळगाव आणि आकाश राजू खरे (वय-२०) रा. दूध फेडरेशन जळगाव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १८ ग्राम वजनाची सोन्याची तुटलेली हस्तगत करण्यात आली.  पुढील तपास आहे स. पो. नि. गणेश अहिरे करीत आहेत.


Protected Content

Play sound