देवगाव येथे विवाहितेचा विनयभंग; बापासह दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव येथे महिलेच्या घरात घुसून ती एकटी असतांना मागील भांडणाच्या कारणावरुन तीन जणांनी तीचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला व तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, देवगाव येथील महिला ही शेतमजुरी करुन उदरनिर्वाह भागविते. २ जून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी भिकन तानकु सोनवणे , किशोर भिकन सोनवणे व सागर भिकमन सोनवणे तीन्ही रा. देवगाव ता. जळगाव हे आले. मागील भांडणाच्या कारणावरुन भिकन याने महिलचा हात पकडून आज तुल सोडणार नाही, असे म्हणून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तर भिकनच्या मुले सागर व किशोर याने महिलेला तु माझ्या वडीलांवर केस केली तर शेतात जातांना तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी काल बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्य सुमारास ४० वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात भिकन तानकु सोनवणे , किशोर भिकन सोनवणे व सागर भिकमन सोनवणे तीन्ही रा. देवगाव ता. जळगाव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अरुण राठोड करीत आहेत.

Protected Content