खडसे पंपासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील खडसे पंपासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री आकराऊत येथे जत्रा भरलेली असून या यात्रेत जवळपासच्या सर्व गावातून यात्रेकरूंची गर्दी होत असते. अशाच प्रकारे यात्रा पाहण्याच्या ओढीने मुक्ताईनगर नगर पंचायतीत कर्मचारी असलेले रत्नदिप कोचुरे व संजय सोनार हे यात्रा पाहून दि 22 मार्च च्या मध्यरात्री 1 ते 1: 30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडे परतत असतांना  रक्षा खडसे यांच्या पंपासमोर एका अज्ञात वाहने त्याच्या दुचाकी वाहनास धकड दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यात रत्नदीप कोचुरे हे जागीच ठार झाले तर संजय सोनार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु होती.

दरम्यान , मुक्ताईनगर नगरपंचायत मधील एक हसत मुख , व मनमिळावू असलेला कर्मचारी रत्नदीप कोचुरे यांच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षाचा मुलगा आहे व ते जळगाव येथील प्रॉपर रहिवासी आहेत.

Protected Content