Home क्राईम जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीची धडक : तरुणाचा मृत्यू

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीची धडक : तरुणाचा मृत्यू

0
113

tanaji sawant car accident

सोलापूर प्रतिनिधी । बार्शी तालुक्यातील शेळगावकडे राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडी भरधाव वेगाने जात असतांना गाडीने एका तरूणाला धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना होळे येथे आज सकाळी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे आज सकाळी ही घटना घडली. सावंत यांची गाडी बार्शीहून शेळगावकडे निघाली होती. भरधाव वेगात असलेल्या या गाडीनं भाजी विकणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. त्यात तो जबर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला आहे. श्याम असे मृत्यु तरुणाचे नाव आहे. अपघात झाला तेव्हा तानाजी सावंत हे गाडीतच होते. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या एका गाडीने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. संतप्त झालेल्या जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली असून सावंत यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound