पहूर येथे कोरोनाचा पहिला बळी; ७३ वर्षीय वृध्दाचा मृत्यू

पहूर , ता जामनेर रविंद्र लाठे । पहूर पेठ येथे ७३ वर्षाच्या वृध्दाचा कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झाला असून या विषाणूच्या संसर्गाचे ते परिसरातील पहिले बळी ठरले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, पहूर पेठ येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी पदाधिकारी असणार्‍या ७३ वर्षीय वृध्दाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यांच्यावर जळगाव येथील कोवीड रूग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा आज रात्री मृत्यू झाल्याचे खाजगी रुग्णालयातील प्रशासनाचे वतीने सांगितले आहे.

दरम्यान, पहूर येथील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आर.टी .लेले हायस्कूल या क्वारंटाईन सेंटरमध्ये शुक्रवार दि. १७ रोजी घेण्यात आलेल्या ४३ रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टस् पैकी ६ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह तर ३७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती नोडेल ऑफिसर डॉ . हर्षल चांदा यांनी दिली. या बाधितांमध्ये हिवरी- ३; एकूलती – १; बिलवाडी -१ व रोटवद – १ अशा रूग्णांचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजन टेस्ट कामी डॉ. हर्षल चांदा डॉ. पुष्कराज नारखेडे, डॉ. संदीप कुमावत, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. कुणाल बाविस्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील चौधरी, देवेंद्र घोंगडे ,प्रदीप नाईक ,संजय सरपटे, अशा सेविका तसेच वैद्यकीय यंत्रणेसह पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.

Protected Content