सावखेडासीम येथील शेतकर्‍याची आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम गावातील राहणारे प्रकाश देवराम पाटील या शेतकर्‍याने आपल्या खळ्यात गळफास घेऊन आत्महत्याची केल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, प्रकाश देवराम पाटील यांनी १६ जुलै रोजी रात्र आठ वाजेपासून ते दिनांक १७ जुलै चे सकाळी सहा वाजे दरम्यान त्यांचे गावालगत असलेल्या खळ्यात पत्राचे शेड मध्ये असलेल्या पाइपला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत संदर्भात यावल पोलीस स्टेशनला मयत याचा मुलगा प्रवीण प्रकाश पाटील यांनी खबर दिल्या वरून पोलिसात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३८ प्रमाणे दाखल झाली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल असलम शेख करीत आहेत मयत प्रकाश पाटील यांच्या पश्‍चात पत्नी दोन मुले तीन भाऊ सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या गळफास घेण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी असलम शेख हे करीत आहे. मयत प्रकाश देवराम पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content