चाळीसगावात कृषी कायद्याविरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन !

चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्ये हे शेतकरी विरोधात असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी चाळीसगावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन आज करण्यात आले असून याबाबतचा निवेदन तहसीलदार व शहर पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदा हा शेतकऱ्यांविरूध्द आहे. त्यामुळे ते तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील तहसिल कार्यालयासमोर दि. 5 मार्च 2021 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन तहसीलदार अमोल मोरे व पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना देण्यात आले. निवेदनात केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे शेतकरी विरोधात आहेत. या कायद्याने फक्त भांडवलदारांचे भले होणार आहे. शेतकरी आज हलाकीचे जीवन जगत आहे. या कायद्यामुळे देशातील शेतकरी भूमिहीन होऊन शेती सुद्धा वाचवू शकणार नाही. तसेच देशात गरीबी वाढेल. त्यामुळे या कायद्याचा निषेध करत हा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

निवेदनावर तालुका अध्यक्ष संभा आप्पा जाधव, शहर अध्यक्ष राहुल चव्हाण, तालुका सचिव भाईदास गोलाईत, ऍड राहुल जाधव, गौतम मोरे, मुकेश नेतकर, गणेश देवरे असीम सैय्यद, सोनु जाधव शाम जाधव, आकाश जाधव, शुभम मोरे, कैलास निकम, अजय जाधव भिमराव मोरे विकास बागुल सागर जाधव आदींचे  सह्या आहेत. आंदोलनाला रयत सेनेचे गणेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रवक्ता दिलीप घोरपडे, वकील संघाचे ऍड राहुलजी जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राकेशभाऊ निकम राहुल कुमावत यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला.

Protected Content