सिका इ मोटर्सच्या स्मॅकचा दिमाखात लाॅन्चिंग सोहळा संपन्न

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सिका इ मोटर्स च्या स्मॅक या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे काल शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी लाॅन्चिंग  सोहळा आयोजित करण्यात आला होता अशी माहिती सिका इ मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम दयाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी प्रमोद दयाराम पाटील, अमोल प्रकाश पाटील, राजेंद्र तेलोरे, अविनाश पाटील, सुरज कोलते उपस्थित होते.

 

खानदेशातील प्रत्येक शहर, गाव,खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून स्वतः पासून सुरुवात करून आपला परिसर प्रदूषण मुक्त करण्याचे आवाहन श्रीराम पाटील यांनी केले. तसेच या स्मॅक स्कूटर बद्दल सांगतांना त्यांनी सांगितले की, ही स्कूटर आरटीओ पासिंग प्रकारातील असून यात ६० व्होल्टची दमदार लिथियम आयन बॅटरीचा समावेश केलेला आहे. या बॅटरीमुळे सदरील स्कूटर प्रति चार्ज १०० किलोमीटर चालेल असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्ले, रिजनरेटिव्ह कंट्रोलर, टेलिस्कोपिक सस्पेंशन, अँटीथेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गियर, साईड स्टॅन्ड सेन्सर, ट्युबलेस टायर्स तसेच यूएसबी चार्जर यासारख्या विविध सुविधा उपलब्ध असून, सदर स्कूटर ७ विविध रंगात उपलब्ध आहे. वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत यासाठी इलेक्ट्रिक वाहन किती आवश्यक आहे याची गरज बघता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काल लाॅन्चिंग सोहळ्यात २५ स्कूटर खरेदी करण्याचे आश्वासन देऊन बुकिंग केले आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content