मृतदेह कचरा कुंडीत टाकायचे लिहून ठेवत जळगावात एकाची आत्महत्या

8bd63975 7940 4922 84bf 2edfe08eea05

 

जळगाव प्रतिनिधी | शहरातील हरिविठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने घरात कोणीच नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी संबंधित व्यक्तीने मी स्वतः मृत्यूस कारणीभूत आहे, माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचरा कुंडीत टाका, असे सुसाईड नोटमध्ये  लिहून ठेवले आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश हिम्मत मकवाना (वय 40 रा.हरिविठ्ठल नगर, भटवाडा वाडाजवळ) हे पेंटींग चे काम करतात. पत्नी आणि 3 मुले धरणगाव येथे माहेरी गेल्या होत्या. याने आज राहत्या घरात कोणीही नसताना दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पत्र्याच्या छताला असलेल्या पाइपला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. मोठा मुलगा विकास हा घरी आला तेव्हा गळफास घेतल्याचे लक्षात आले.

 

सुसाईड नोट आढळली

राजेश मकवाना यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे की, “मी एकटा आहे, त्यामुळे मी बेवारस आहे, तरी कुणास ही जबाबदार धरू नये, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, मी स्वतः मृत्यूस कारणीभूत आहे, माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचरा कुंडीत टाका, हीच नम्र विनंती. सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होवो ही बुद्ध चरणी प्रार्थना, असे नमूद आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यासाठी रवाना केले आहे. विवेक बापू मोरे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 3 भाऊ असा परिवार आहे.

Protected Content