प्रादेशिक साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोहचले पाहिजे- प्रेमानंद गज्वी

premanand gajvi in chopda

चोपडा डॉ. सुशिलाबेन शहा साहित्य नगरी प्रतिनिधी । जाणिवेच्या वेदनेशिवाय कला निर्मिती शक्य नसल्याचे नमूद करत प्रादेशिक साहित्य हे राष्ट्रीय स्तरावर पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अ.भा.नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी येथे व्यक्त केले. ते महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलनाच्या डॅा.सुशिलाबेन शहा साहित्य नगरीत बोलत होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी होते.

यावेळी प्रेमानंद गज्वी पुढे म्हणाले की, ज्ञानदर्शी व उपाय योजना सांगणारी कला असली पाहिजे.कला कुणाची बटीक नसते.बटीक असते ती कलाच नसते. मराठी साहित्य भारतातील सर्व भाषांसह परकिय भाषेत गेले पाहिजे.वेदना व्यक्ती,राष्ट्र समाजाची बनते. व्यक्ती विरूद्ध समाज, समाज विरूद्ध समाज,माणसाला शरम आणणा-या गोष्टी आपण लिहल्या पाहीजेत.समाज विरूद्ध राष्ट्र असाही घटक आहे.राष्ट्र विरूद्ध राष्ट्र,शासनाच्या विरोधात साहित्यिकांनी काही लिहलं का? राज्यकर्त्यांना द्वेष पेरतात,३७०,रामजन्मभुमी, यावर बोलायचं नाही असे भावना दाबणारे वातावरण का निर्माण केले जाते?भाडवंलदार व भांडवलविरहीत साहित्यातील कंपू साहित्याचे भले करु शकत नाही असेही त्यांनी सांगितले.कलाकृती समग्रतेचे भान असणारी घडो हीच इच्छा आहे गज्वी यांनी व्यक्त केले.

संमेलाच्या प्रारंभी अपर्णा भट कासार (जळगाव) यांच्या समूहाने गणेश वंदना व सरस्वती वंदना सादर केली.
यावेळी संमेलनाचे उद्घाटन उदघाटन अ.भा.मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.तसेच मान्यवरांनी दिपप्रज्वलन करुन केले. प्रास्ताविक करतांना नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी सांगितले की, बहिणाबाई अशिक्षीत असल्या तरी त्यांचा स्वानुभव त्यांनी आपल्या कविता मांडल्या त्यातील विचार अत्यंत मोलाचा आहे.पुन्हा जळगाव जिल्ह्यात साहित्य संमेलन व्हावे अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी करुन दिला. सत्कार समारंभात उद्घाटक प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार अशिष गुजराथी यांनी केला.तर मान्यवरांचा सत्कार उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू,संचालक मोरेश्‍वर देसाई,विद्या अग्रवाल,अ‍ॅड.अशोक जैन,रजनी सराफ,श्रीकांत नेवे यांनी केला.
याप्रसंगी देणगीदार माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी,माजी अध्यक्ष अरविंद गुजराथी,अ‍ॅड.व्ही.डी.जोशी,प्रदीप जैन,डॅा.विकास हरताळकर, डॉ. मधुमालती भुतडा,प्रा.डी.जे.पाटील, शब्द मैत्री मंडळ बर्‍हाणपूर, राजीव मुजूमदार,अनुराधा मुजूमदार यांचे स्वागत करण्यात आले.

या संमेलनात साहित्य क्षेत्रातिल विशेष योगदानाबद्दल कविवर्य अशोक सोनवणे,मध्यप्रदेश मराठी अकादमीच्या निदेशक पदावर नुकत्याच नियुक्त झालेल्या चोपड्याच्या सुकन्या पौर्णिमा हुंडीवाले यांचा सत्कार प्रेमानंद गज्वी,डॅा.केशव देशमुख, प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह देवून करण्यात आला. तर नगर वाचन मंदिराच्या सभासदांमधून २०१७/१८ सालासाठी पी.एन.सोनार. तर सन २०१८/१९ डॅा.मनोहर अग्रवाल यांना माजी उपनगराध्यक्ष स्व.नानासाहेब रमेश वसंतराव देशमुख उत्तम वाचक पुरस्कार देवून नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी ,प्रा. डॅा.केशव देशमुख व मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले.

भगिनी मंडळाच्या सदस्यांनी निर्माण केलेल्या जमुनाई या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी,ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते. अध्यापक विद्यालयाची विद्यार्थीनी पल्लवी बाविस्कर हीने ग्रंथदिंडी व साहित्य संमेलन स्थळी बहिणाबाई चौधरी यांची भुमिका सादर केली म्हणून तीचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी नगर वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष डॉ. किसनलाल बी.भुतडा, माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, उद्घाटक अ.भा.मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी(मुंबई) ,साहित्यिक प्रा.डॅा.केशव देशमुख(नांदेड) , महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य अशोक सोनवणे,रमेश पवार (अमळनेर),मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीच्या निदेशिका पौर्णिमा हुंडीवाले (बर्‍हाणपूर), साहित्यिक कुंदा प्रधान (कोल्हापूर), वि.दा.पिंगळे (पुणे),डॅा.मिलिंद बागूल (जळगाव),नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी,उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश गुजराथी आदी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी म्हणाले की, भाषेच्या माध्यमातून साहित्य निर्माण करण्यासाठी वेगळे मुल्य लागतात त्यांची जोपासना झाली पाहिजे.साहित्यिकांना शब्दशक्ती कमी असली तरी राष्ट्रभक्ती असली पाहिजे.मराठीत साहित्य समृध्द आहे.कवितेला गेय नसला तरी ध्येय असले पाहिजे. देशातील आई व साहित्यिक चांगले असल्याने प्रगती निश्‍चित होणार आहे. दरम्यान, खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलनाचा नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर या जिल्हास्तरीय पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन साहित्यिक डॅा.केशव देशमुख व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या साहित्य संमेलनास माजी आ.प्रा.दिलिपराव सोनवणे,सुतगिरणीचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील, पालिकेचे गटनेते जीवन चौधरी यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बारी,अविनाश कुलकर्णी, प्रभाकर महाजन यांनी केले.आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी यांनी केले.

Protected Content