चोपड्याच्या श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.

 

चोपडा, प्रतिनिधी । ए आय सी टी इ.,डी टी.इ., एम एस.बी.टी.इ मान्यताप्राप्त तंत्रनिकेतन ची स्थापना 1983 साली झाली असून येथे विविडंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

 

सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनाची शिक्षण देणारी ही संस्था गेल्या 35 वर्षांपासून कार्यरत आहे. अध्यक्ष ॲड. संदीप पाटील , उपाध्यक्षा आशाताई पाटील , सचिव डॉ. स्मिता पाटील व डी.बी.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आजपर्यंत ह्या तंत्रनिकेतन मधून साडेसात हजार मुले व साडेतीन हजार मुलींनी शिक्षण घेतले. यातील काही विद्यार्थी परदेशात कंपन्यांमध्ये काम करीत आहेत ,काही विद्यार्थी भारतातील नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत ,तर काही विद्यार्थी सरकारी नोकरी करीत आहेत. तंत्रनिकेतनमध्ये अनुभवी शिक्षक वृंद ,सुसज्ज लॅब्स व ग्रंथालय आहे स्थापत्य अभियांत्रिकी ( जागा 60), संगणक अभियांत्रिकी ( जागा 60 ), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ( जागा 60 ), मेकॅनिकल इंजिनिअरिंग ( जागा 60 ) असे प्रवेश येथे सुरु आहेत.  शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्रनिकेतनची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सुविधा केंद्र लवकरच संस्थेत सुरू होणार आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार फी सवलतीचा लाभ घेता येईल. पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष ॲड.संदीप पाटील, सचिव त डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य व्ही. एन. .बोरसे ,उपप्राचार्य एन .आर. शिंदे यांनी ही माहिती दिली.

Protected Content