गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात शिक्षक दिवस उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाकडून शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी आईला गुरुस्थानी मानून लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्यात. यात आई आणि गुरुजन यांच्याबद्दल आदरही व्यक्‍त केला. यानंतर सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी बालपणीच्या शिक्षक दिनाच्या आठवणीत हाताने तयार केलेले ग्रीटिंग्स, पेंटिंग याबद्दल सांगितले.

यावेळी डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिन डॉ.जयंत देशमुख, गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉ.मोसमी लेंढे, डायरेक्टर शिवानंद बिरादार यांनी आपली शिक्षक दिनाचे महत्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. यावेळी नर्सिंग कॉलेजचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे, प्रा.अश्विनी वैद्य, प्रा.मनोरमा कश्यप यांच्यासह नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content