३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींनी माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव आदर्श विद्यालयातील ३५ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत एकत्र येत दिला शालेय जिवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दहिगाव तालुका यावल येथील ३५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आदर्श विद्यालयातील आपले गुरूजन शिक्षकांचा माजी शिक्षकांचा सत्कार करीत शाळेला स्क्रीन प्रिंटर भेट दिली आणि स्नेह भोजनाचा आनंद घेतला. संस्थेचे चेअरमन सुरेश देवराम पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. सन १९८८ – ८९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद,सुरत येथून आपल्या शाळेला माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यात ३५ विद्यार्थी तर दहा माजी शिक्षक उपस्थित होते. या वर्षात असलेले माजी सेवानिवृत्त शिक्षक आज ही आमच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित आहे हा आमचा गर्व आहे असे विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत असताना भावना व्यक्त केल्यात. यावेळी आपल्या शालेय जिवनातील जुन्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले.

याप्रसंगी शिक्षकांनी मार्गदर्शन करतांना आपल्या जीवनात कसे वागायचे कसे राहायचे याबाबत एस आर पाटील सर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक पी. बी. पाटील, पर्यवेक्षक साळुंखे, रमण भोगे, एम.डी नारखेडे, व्ही. टी. फेगडे, व्ही.डी. चौधरी, एस. जे. काळे, व्ही.डी. झोपे, पी. एस. चौधरी यांचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहा हजार रुपये किमतीचे प्रिंटर शाळेला गरज असताना दिले आणि शाळेचे ऋण आम्ही कधीही विसरणार नाहीत अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमात प्रवीण कुलकर्णी भानुदास महाजन राजेश जैन राजेश चौधरी संजय ठाकूर सुनील पाटील राजू महाजन ललित पाटील उपस्थित होते.

Protected Content