चितोडा गावात मोकाट माकडांचा मुक्त संचार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चितोडा गावात माकडांचा संचार वाढल्याने ग्रामस्थांना व त्यांच्या कुंटुबीयांना अनेक त्रास व अडचणींना सामोरे जावे लागत असून माकडांच्या या गोंधळामुळे अनेक नागरिक धास्तावले आहे. याबाबत सरपंच पाटील यांनी वनविभागाला या मोकाट माकडांचा त्वरीत बंदोबस्त व्हावा, या संदर्भात लिखित निवेदन दिले आहे.

यावल तालुक्यातील चितोडा गावात मागील एक महिन्यांपासून सातपुडा या जंगलातून आलेल्या माकडांचा उपद्रव वाढला आहे. माकडांच्या या मुक्त संचारामुळे उडालेल्या गोंधळामुळे चितोडा गावातील ग्रामस्थ कमालीचे धास्तावले आहे. या शिवाय तालुक्यातील अट्रावल येथील संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीमुंजोबा महाराज यांची यात्रा सुरू होत असुन, चितोडा गावापासुन २ किलोमिटर लांब असलेल्या अट्रावल गावातील यात्रेत जर ही माकडे शिरली किंवा चितोडा गावाकडुन अट्रावल यात्रेसाठी जाणाऱ्या या मार्गावरील पादऱ्यांना किंवा दुचाकी वाहनाने देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. माकडांच्या या टोळक्यांचा वेळीच बंदोबस्त व्हावा या संदर्भात चितोडा गावातील सरपंच अरुण देविदास पाटील व ग्रामसेवक पि .व्ही तळेले यांनी वन विभागाच्या पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांना पत्र देऊन अशी मागणी केली आहे.

Protected Content