चोपडा प्रतिनिधी । शहरातील नामांकित जेष्ठ धन्वंतरी डॉ.दीपक पाटील व डॉ.दिलीप पाटील यांच्या नृसिंह हॉस्पिटल संचलित परिश्रम मंडपम या प्रशस्त इमारतीत खासगी कोविड-(१९) सेंटरचे उदघाटन तहसीलदार अनिल गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नृसिंह हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक पाटील,डॉ.दिलीप पाटील व डॉ.चंद्रकांत बारेला यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी भरत कोसोदे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर,डॉ. दीपक चौधरी, शेतकरी कृती समिती चे समन्वयक एस.बी.पाटील,जळगाव जिल्हा कोविड कॉर्डीनेशन कमिटीचे सदस्य पवन जैन, डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.भरत पाटील, डॉ.अशोक कदम, डॉ.सुवालाल पाटील, डॉ.सैय्यद, सनी पाटील, आर्किटेक्ट किर्ती जैन यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.