सलग दुसर्‍या दिवशी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई प्रतिनिधी । राज्यात आज सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख २४ हजार ९११ नमुन्यांपैकी ७ लाख ०३ हजार ८२३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८९ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,४२५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :-
मुंबई मनपा-५८७ (३५), ठाणे- १०५ (३), ठाणे मनपा-१४३ (९), नवी मुंबई मनपा-३०२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-९४ (२), उल्हासनगर मनपा-१३ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१३, मीरा भाईंदर मनपा-९२ (४), पालघर-८६, वसई-विरार मनपा-५५ (३), रायगड-१४८ (३५), पनवेल मनपा-६९, नाशिक-१७० (१), नाशिक मनपा-६७५ (७), मालेगाव मनपा-५, अहमदनगर-२५६ (५),अहमदनगर मनपा-२०६ (३), धुळे-३६, धुळे मनपा-६ (१), जळगाव- ४७६ (६), जळगाव मनपा-१४३ (६), नंदूरबार-१०७, पुणे- ४५८ (१३), पुणे मनपा-१२२८ (३६), पिंपरी चिंचवड मनपा-८४२ (९), सोलापूर-३०५ (२), सोलापूर मनपा-४० (२),

सातारा-४८९ (८), कोल्हापूर-३५८ (२०), कोल्हापूर मनपा-१३२ (१७), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२९ (१०), सिंधुदूर्ग-७४, रत्नागिरी-४६, औरंगाबाद-१७४ (६),औरंगाबाद मनपा-२३७ (१५), जालना-३२ (१), हिंगोली-६, परभणी-५०, परभणी मनपा-३३ (१), लातूर-८१(६), लातूर मनपा-८४ (२), उस्मानाबाद-१०५ (७),बीड-१२२ (३), नांदेड-१२९, नांदेड मनपा-१४ (१), अकोला-२२ (१), अकोला मनपा-१४, अमरावती-४२, अमरावती मनपा-४०, यवतमाळ-८४, बुलढाणा-२७ (१), वाशिम-७, नागपूर-१८४ (३), नागपूर मनपा-६०५ (२१), वर्धा-५०(१), भंडारा-४९ (२), गोंदिया-३४, चंद्रपूर-४२ (१), चंद्रपूर मनपा-३० (१), गडचिरोली-२४, इतर राज्य ७.

Protected Content