रावेर, प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी युवकांनी पूर्ण ताकदीनीशी उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केले आहे. तसेच यापुढे प्रत्येक गावात ‘वन बूथ टेन यूथ’ कार्यक्रम राष्ट्रवादीतर्फे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. येथील कृषी उपन्न बाजार समितीमध्ये आज (दि.१) राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची एक बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी म्हणाले की, देशात बेरोजगारी व आर्थिक आणीबाणी उफाळत असतांना भाजपावाले लोकांना मूर्ख बनविण्याचे काम करताहेत. महाराष्ट्रातील किती युवकांना रोजगार दिला, किती उद्योगधंदे वाढवण्यासाठी काम केले, हे त्यांनी जनतेसमोर मांडावे, असे आवाहन यावेळी चौधरी यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, राष्ट्रवादी सेवा दलचे प्रकाश पाटील, आदिंनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी बैठकीला शहराध्यक्ष महेमुद शेख, सचिन पाटील, विलास ताठे, अमोल पाटील, विक्रम पाटील, प्रशांत पाटील, जिजाबराव पाटील, अमोल पाटील, हर्षल पाटील, लतीप पिंजारी, मिलिंद चौधरी, अजय तायडे, तुषार पाटील, संदीप बा-हे आदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संखने उपस्थित होते. यावेळी बैठकीत एकमताने माजी जिल्हा परीषद सदस्य रमेश पाटील यांचा मुलगा सचिन पाटील यांचे नाव राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पदासाठी पुढे आल्याने त्यांची नेमणुक युवक जिल्हाध्यक्षांनी केली. यावेळी प्रशासनाविरोधात तहसील कार्यालयात निवेदनही देण्यात आले.