भुसावळातून सोलापूर पूरग्रस्तांकरिता मदत रवाना

BL13STATESKOHLAPUR

भुसावळ, प्रतिनिधी | येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे महामंत्री जगन सोनवणे व त्यांच्या पत्नी नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी सोलापूर येथील पूरग्रस्तांकरिता गोळा केलेली मदत ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ने नुकतीच पाठवली आहे.

 

जगन सोनवणे व पुष्पा सोनवणे हे दांपत्य गेल्या अनेक दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी घरोघरी जाऊन मदत गोळा करीत होते. यात कपडे, धान्य, औषधी व रोख रक्कम अशी मदत गोळा झाली होती, ती पाठवण्यात आली आहे . या उपक्रमात विविध १० संघटनांनी सहभाग घेवून सोनवणे यांनी केलेल्या जनसेवेच्या कार्याला हातभार लावला आहे. सोनवणे दांपत्याच्या या कार्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Protected Content