शहरांच्या चौफेर विकासाला प्राधान्य – एकनाथ शिंदे

पाचोरा प्रतिनिधी ।  राज्यातील मोठ्या आणि छोट्या शहरांच्याही चौफेर विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाचोरा व भडगावच्या विकासाबद्दल आमदार किशोर पाटील घेतलेली भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

पाचोरा नगरपरिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते . नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की , लोक आपला आमदार आकांक्षेने निवडून देतात त्यामुळे आपल्या मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवणे आमदाराला क्रमप्राप्त असते आणि या दृष्टीने अगदी योग्य वाटचाल आमदार किशोर पाटील करीत आहेत माझ्याकडे नगरविकास खाते आल्यापासून आधी महत्व पाणी पुरवठा योजनांना आणि त्यानंतर मलनिस्सारण व्यवस्थेला व नंतरच्या टप्प्यात रस्ते आणि अन्य कामांना देण्याचे ठरलेले आहे शहरांच्या विकासासाठी एकात्मिक धोरण असावे म्हणून बऱ्याच नगरपालिका आणि महानगरपालिकांचे वेगेवेगळे नियम बदलून सर्वत्र सारखे नियम आम्ही अमलात आणलेले आहेत  शहरांजवळच्या शेतीत आता शेतकरीही व्यावसायिक कामे करू शकतो त्यासाठी नियम लवचिक केले आहेत त्यासाठी एफएसआय ०. २ वरून १  टक्क्यावर आणला आहे शेवटी लोकांची कामे होणे महत्वाचे आहे , असेही ते म्हणाले .

 

Protected Content