विवाहाच्या दुसर्‍याच दिवशी वधू रफूचक्कर !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवशी नववधु सासरच्या घरुन रफूचक्कर झाल्याची घटना रावेर तालुक्यात घडली आहे. यामुळे सासरकडील मंडळीने रावेर पोलिसात मिसिंग दाखल केली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार यावल तालुक्यातील एका वधुचे रावेर तालुक्यात लग्न झाल होत.दुसर्‍या दिवसी नववधुला बघितल असता नववधु घरात नव्हत्या या बाबतची माहिती नातेसंबधमध्ये पसरली असता नववधुचा शोधा-शोध सुरु झाला.अखेर वधू कुठेच मिळाली नसल्याने सासर कडील मंडळीने रावेर पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल केली आहे. या घटनेची रावेर परिसरात एक चर्चा होती.

अलीकडच्या काळात तरूणींच्या पलायनाची प्रकरणे वाढीस लागली असतांना आता नववधू रफूचक्कर झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content