धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

धाराशिव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिवमध्येही या टप्‍प्यात मतदान होत असून एका मतदान केंद्राजवळ धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हयामधील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे.

हा वाद दोन गटामध्ये झाला होता. परंतू त्यांचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा सामना महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अर्चना पाटील यांच्या सोबत रंगला आहे.

Protected Content