नावरे येथील शेतमजुराचा विषारी साप चावल्याने दुदैवी अंत

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील यावल चोपडा मार्गावरील नावरे गाव फाटयाजवळच्या शेतात विषारी सर्पदंश झाल्याने तरूण शेतमजुराचा मृत्यु झाल्याची  घटनासमोर आली असून यावल पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,  सुनील भिमसिंग पाटील  ( वय ४२ वर्ष रा. नावरे ता. यावल ) हा तरूण शेतमजुरी आपला उदरनिर्वाह करीत होता. बुधवार दि. २१ डिसेंबर रोजी सुनील पाटील सायंकाळच्या सुमारास पन्नालाल चम्यालाल जैन यांच्या वढोदे शिवारातील शेतात गुरांना कडबाचारा आणण्यासाठी गेला होता. सुनील हा  गावापासुन एक किलोमिटर लांब असलेल्या नावरे फाट्याजवळच्या जैन यांच्या शेतात गेला असता तो उशीरापर्यंत घरी न आल्याने सुनीलची बहीण त्यास शेतात पाहण्यासाठी गेली.  त्यावेळेस तिला शेताच्या बांधावर सुनिल  हा मृत अवस्थेत आढळ्रन आला.  त्यास  विषारी सापाने दंश केल्याने त्याचा दुदैवी मृत्यु झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होते. सुनिल पाटील यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी केले. यावेळी त्यास डाव्या हाताला विषारी सापाने सर्पदंश केल्याने मरण पावल्याचे शवविच्छेदनातुन निष्पन्न झाले.  याबाबत हिम्मत बाबुराव पाटील (वय ४० वर्ष रा. नावरे )यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे व पोलीस हेड कॉस्टटेबल संजय देवरे पोलीस करीत आहे.

 

Protected Content