राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “माईंन्ड प्रोग्रामिंग” सेमिनार उत्साहात

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शहरातील बुऱ्हानी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त दिव्यशक्ती संमोहन केंद्राचे संचालक संमोहन तज्ञ योगेश बारी यांच्या “माईंन्ड प्रोग्रामिंग” या शिबिरातुन स्कुलच्या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल असलेली भिती दुर करण्याचा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला.

आज २२ डिसेंबर म्हणजेच राष्ट्रीय गणित दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. २२ डिसेंबर याच दिवशी श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्म झाला होता. त्यांनी गणिती विषयावर भरपूर संशोधन करून प्रमेय शोधून काढले. ते जगातल्या कोणत्याही शाळा अथवा स्कूल, कॉलेजमध्ये गेलेले नसतांना सुद्धा त्यांच्या अंतर्मनाच्या सहाय्याने गणित विषयात संशोधन केलेले होते. आज सुद्धा त्यांच्या गणित विषयाच्या प्रमेयावर आजचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. आताच्या मुलांना गणित विषय हा खूप कठीण वाटतो. लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये गणित विषयाचा फोबिया घर करुन बसला आहे. त्यामुळे दहावीला असतांना सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गणित हा विषय खूपच कठीण व बोरिंग विषय असुन त्यांना तो खूपच अवघड जातो. त्यांच्या अंतर्मनातील भीती काढून टाकण्यासाठी संमोहनशास्त्र हे खूप मदत करते.

त्याच अनुषंगाने पाचोरा शहरातील दिव्यशक्ती संमोहन केंद्राचे संचालक संमोहन तज्ञ योगेश बारी यांनी बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे माईंन्ड प्रोग्रामिंग शिबिर घेऊन त्यांच्या मनातील गणित विषयाबद्दल असलेली भिती दुर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना इतर विषयांपेक्षा गणित विषय हा सोपा वाटावा म्हणुन व विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये मन लागावे म्हणून माईंड प्रोग्रामिंग करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस एकाग्रता वाढते. ते या शिबिरात योगेश बारी यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

या शिबिर प्रसंगी बुऱ्हानी इंग्लिश मिडीयम स्कूलचे इयत्ता १० वी चे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचेसह स्कुलचे मुख्याध्यापक बी. एन. पाटील, उपमुख्याध्यापिका मनिषा पाटील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content