स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाबाबत कार्यशाळेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात ‘परीक्षेला जातांना’ उपक्रमात इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य विज्ञान व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विद्याशाखेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेत इ.१२वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची ॲक्टिव्हीटी शीट कशी सोडवावी, कमी कालावधीत अधिकाधिक गुण संपादन करण्यासाठी परीक्षेची तयारी नेमकी करावी, वेळेचे नियोजन कसे करावे, कोणत्या प्रश्नावर अधिकाधिक भर द्यावा, कोणत्या चुका टाळाव्यात यासंदर्भात इंग्रजी विभागाच्या वतीने जेष्ठ शिक्षक प्रा.अतुल इंगळे (रिसोर्स पर्सन– इंग्रजी नाशिक बोर्ड) यांचेसह प्रा.सौ.रुपम निळे, प्रा. दिपक चौधरी प्रा. जयंत इंगळे, प्रा.सुरेखा मोरे, प्रा.योगेश धनगर व प्रा.संदीप गव्हाळे यांनी पीपीटीच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचे सखोल व अत्यंत मुद्देसूद मार्गदर्शन करून बोर्ड परीक्षेत अपेक्षित उत्तर नेमके कसे लिहावे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेच्या माध्यमातून आमची इंग्रजी भाषेची भीती दूर झाली व अभ्यास नेमका कसा करावा, उत्तर लेखन कसे करावे याबाबत माहिती मिळून आमचा आत्मविश्वास वाढल्याचा चारही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रातिनिधिक मनोगतातून उल्लेख केला. सदर कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे, उपप्राचार्या के.जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content