खड्डे चुकवतांना दुचाकी घसरली; नगरसेविका जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बहुतांश रस्त्यांवरील खड्डयांनी नागरिक त्रस्त झालेले असतांना अनेक लहानमोठे अपघात होत आहेत. तर याचाच फटका नगरसेविका जयश्री सुनील महाजन यांना बसला असून त्यांची दुचाकी घसरून त्या जखमी झाल्या आहेत.

अमृत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटारीमुळे शहरात सर्वत्र खड्डे पडून रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. यातच मेहरूणच्या नगरसेविका जयश्री सुनील महाजन या रामेश्‍वर कॉलनी परिसरात दुचाकीने जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना त्यांचा वाहनावरील ताबा सुटून त्या खाली पडल्या. त्यात त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांचे पती सुनील महाजन व परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांचा उजवा हात कोपराजवळ फ्रॅक्चर झाल्याचे एक्स-रे त निष्पन्न झाल्याने प्लास्टर लावण्यात आले आहे.

Protected Content